शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

दुष्काळी भागासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

By admin | Published: June 20, 2016 12:30 AM

कवठेमहांकाळला शेतीचे बांध फुटले : जत, तासगाव, शिराळा तालुक्यासह मिरज, सांगली शहरातही रिमझिम सरी

सांगली : दुष्काळी जत, कवठेमहांकाळ तालुक्यासह तासगाव शिराळा, मिरज तालुक्यातही शनिवारी पावसाने हजेरी लावली. कवठेमहांकाळमध्ये वादळी वाऱ्याने द्राक्षबाग कोसळली, तर अनेकठिकाणी शेतीचे बांध फुटले. विद्युत तारा तुटल्यानेही हानी झाली. सांगली व मिरज शहरात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. तासगाव शहरासह तालुक्याच्या पूर्व ग्रामीण भागाला रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस खरड छाटणी घेतलेल्या द्राक्षबागायतदारांना सुखावणारा आहे, तर पेरणीपूर्व मशागतीसाठी तो उत्तम असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पेरण्या जोमाने सुरू होण्यासाठी दमदार पावसाच्या अपेक्षेत शेतकरी आहे. उन्हाच्या झळा सोसलेला द्राक्षबागायतदार व सर्वसामान्य शेतकरी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. पाऊस नसल्याने पेरणीसाठीही शेतकरी खोळंबला होता. रविवारी सायंकाळी आभाळ दाटून आले व वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तासगाव शहरासह तालुक्याच्या लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव, चिंचणी, विसापूर, हातनूर, पेड़, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. द्राक्षबागांना हा पाऊस पोषक ठरत बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. पेरणीपूर्व जमिनीच्या मशागती करण्यासाठी या पावसाची आवश्यकता होती. त्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. तसेच माळरानावर या पावसाने गवत उगवण्यास मदत होणार आहे. मात्र पेरण्या जोमाने सुरु होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. जत शहर व परिसर आणि तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंभारी, धावडवाडी, बागेवाडी परिसरात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील ओढे आणि नाल्यांना पाणी येऊन ते भरुन वाहत होते. तालुक्यातील बनाळी, जत, शेगाव, कुंभारी, बिळूर व डफळापूर भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या आहेत. पेरण्या करण्यापुरताच पाऊस झाला होता, त्यानंतर गडबड करुन शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. पिकासाठी या पावसाने पोषक वातावरण तयार झाले आहे. कवठेमहांकाळ : तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात सर्वत्रच दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी शेताचे बांध फुटले, तर शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तसेच माणसांची वर्दळ कमी झाली होती. शहरातील भाजीमंडईतही शुकशुकाट होता. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून संपूर्ण तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील नागज, केरेवाडी, शेळकेवाडी, आगळगाव, कुची, शिरढोण, लांडगेवाडी, रांजणी, पिंपळवाडी, करोली (टी) तसेच कवठेमहांकाळ शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरात रस्त्यावरून पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते. पिंपळवाडी व तालुक्यातील इतर काही गावातही मोठा पाऊस झाल्याने शेतीचे बांध फुटले. अनेक शेतींमध्ये पावसाच्या पाण्याने तलाव साचले होते. दिवसभर वातावरण ढगाळ होते. सूर्याचे दर्शन झाले नाही. रात्रभर पावसाच्या सरी येत होत्या. या पावसाने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात काहीठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.