शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात

By admin | Published: August 02, 2016 12:17 AM

सखी झाल्या चिंब : कलर्स प्रस्तुत, सखी मंच आयोजित कार्यक्रम; नृत्य स्पर्धेचीही रंगतरिमझिम गाण्यांची सुरमयी बरसात सखी झाल्या चिंब : कलर्स प्रस्तुत, सखी मंच आयोजित कार्यक्रम; नृत्य स्पर्धेचीही रंगत

सांगली : बाहेर ऊन-पावसाचा खेळ आणि सभागृहात पाऊस गाण्यांचा कोसळणाऱ्या धारांमध्ये सखी चिंब झाल्या. निमित्त होते कलर्स प्रस्तुत 'सखी मंच'च्यावतीने आयोजित ‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रमाचे. विष्णुदास भावे नाट्यगृहात शनिवारी सखींच्या भरगच्च गर्दीत हा कार्यक्रम बहरला. जुन्या व नव्या प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील गाणी 'आॅर्केस्ट्रा हिटस बिटस्चे प्रल्हाद पाटील यांच्यासह फैजल पटेल, भक्ती साळुंखे यांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे उद््घाटन उद्योजिका आशा जैन यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश वाडकर व लता मंगेशकर यांच्या ‘मेघा रे मेघा रे..’ या गीताने झाली. त्यानंतर ‘मोहब्बत बरसा देना तू..’, ‘बाहो में चले आ..’, ‘जिंदगी प्यार का गीत हैं..’, ‘चिंब पावसाने रान झालं..’, अशी एकाहून एक सुरेख गीते सादर करण्यात आली. या पाऊस गाण्यांनी सभागृहातही जणू उत्साहाच्या पावसाची बरसात झाली. या गीतांवर सखींनी नृत्याचा आनंद लुटला. यावेळी झालेल्या नृत्य स्पर्धेस परीक्षक म्हणून टीना मूग, कंचन साधवानी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) ‘झलक दिखला जा’ नृत्य स्पर्धा कलर्स प्रस्तुत सखी मंच 'रिमझिम गाणी; झलक सुहानी' या कार्यक्रमात कलर्स चॅनेलवर सादर करण्यात येत असलेल्या 'झलक दिखला जा हॉट है' या डान्स शोवर आधारित नृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम दहा सखींनी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर नृत्यांगनांचा अंतिम सामना घेण्यात आली. या स्पर्धेत जॅकलिन फर्नांडिसच्या ‘लत लग गई' या गाण्यावर सखींनी नृत्य केले. विशाखा सपकाळ, संजीवनी पाटील, प्रीती देशपांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 'झलक दिखला जा हॉट हैं' कलर्स चॅनेलवर शनिवारपासून रात्री १0 वाजता 'झलक दिखला जा हॉट हैं' ही स्पर्धा सुरू आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २00६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल जॅकलिन फर्नांडिस सेलिब्रेटी जज आहे. याशिवास सुप्रसिद्ध निर्देशक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडेसुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण १२ सेलिबेट्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्यात सुर्विन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ) सहेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता, शांतनू माहेश्वरी असे १0 प्रख्यात सेलिब्रेटी या शोचे आकर्षण आहे, पण जॅकलिनच्या सहभागाने या शोला ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरुप आले आहे, हे या शोचे वैशिष्ट्य.