शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 7:14 PM

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता.

सांगली : मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्याशी भाजपने युती करायची की नाही, याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. तरीही ही युती झाल्यास त्याचा तोटा भाजपला होण्याची शक्यता नाही, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज, मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, राज ठाकरे आजही हिंदुत्ववादी भूमिकेशी ठाम आहेत. त्यामुळे भाजप त्यांचे समर्थन करीत आहे. त्यांच्या आयोध्या दौऱ्यालाही भाजपच्या सर्व नेत्यांनी पाठींबा दर्शविला होता. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता, असा आमचा आरोप आहे. राज ठाकरेंना समर्थन करण्याची भूमिका भाजपने घेतली होती, मात्र बृजभूषण यांनी नेमकी विरोधातील भूमिका घेतली. त्यांनी तसे का केले, याची कल्पना आम्हाला नाही, पण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.भाजपकडून कधीही ध्रुवीकरणाचा प्रयत्न नाहीमहाराष्ट्रात धार्मीक, जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न कधीही भाजपकडून झालेला नाही. हा चुकीचा आरोप भाजपवर होत आहे. भाजप केवळ त्यांची हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नावरही लढत आहोत. औरंगाबाद येथे जलआक्रोश मेळावा हे त्याचेच उदाहरण आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीत जलजीवन मिशनची कामे होत असताना भाजप लोकांसाठी काही करीत नाही, अशी विरोधकांची टीका दिशाभूल करणारी आहे.राज्य शासनाला जनतेचे सोयरसूतक नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचे दर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर राज्य शासनाने आणखी कमी करायला हवे होते, पण केवळ फसवी घोषणा त्यांनी केली. त्यांना जनतेचे सोयरसूतक नाही.बृजभूषण यांच्या खांद्यावर बंदूकराष्ट्रवादी नेत्यांनी बृजभूषण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. भाजपचे हे खांदे इतके कमकुवत आहेत का, असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर दरेकर यांनी सावरत तसे काही नसल्याचे सांगितले.गॅस दरही योग्यवेळी उतरतीलपेट्रोल व डिझेलचे भाव ज्यापद्धतीने उतरले आहेत, त्याचपद्धतीने योग्यवेळी गॅस सिलिंडरचे दरही उतरतील. नरेंद्र मोदी असा निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असेही दरेकर म्हणाले.मुख्यमंत्री खोटे बोलताहेतकेंद्र सरकारने जीएसटीचे २५ हजार कोटी महाराष्ट्राला दिले नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती खोटी आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा १ रुपयासुद्धा देणे लागत नाही, असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीMNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेpravin darekarप्रवीण दरेकर