लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : मानव संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजाराम बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. राज्य संपर्क अधिकारी जी. एम. भगत यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
येथील काॅंग्रेस कमिटीच्या कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते भगत व पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून अल्लाबक्ष मुल्ला यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, उपाध्यक्ष धनाजीराव पाटील, राजर्षी शाहू विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश कोळेकर, शहराध्यक्ष राजाराम घोरपडे, जगन्नाथ चव्हाण, जगन्नाथ माने, सुनील वाघमारे उपस्थित होते.