तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथे पेट्रोल पंपाचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व रत्नकांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंदराव पाटील, विराज शिंदे, भगवान पाटील, बाळासाहेब पवार, दादासाहेब मोरे, माणिक शेळके, आर. डी. माहुली उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेतर्फे तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथील कार्यस्थळावर पेट्रोल पंपाची उभारणी केली आहे. या पंपाच्या माध्यमातून या परिसरातील जनतेला निश्चितच शुध्द व दर्जेदार इंधन मिळेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
तिप्पेहळ्ळी (ता. जत) युनिट कार्यस्थळावर नव्याने उभारलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन पाटील व त्यांच्या पत्नी रत्नकांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, विराज शिंदे, पै. भगवान पाटील, दिलीपराव पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, आनंदराव पाटील, दादासाहेब मोरे, जालिंदर कांबळे, माणिक शेळके, सुवर्णा पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते.
पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्याबरोबरच दुष्काळी भागाच्या विकासासाठी संघर्ष केला आहे. त्यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहेत.
आर. डी. माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी एस. डी. कोरडे, मुख्य अभियंता विजय मोरे, प्रेमनाथ कमलाकर, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सुदाम पाटील, नंदकिशोर जगताप, शिवाजी चव्हाण, संस्थेचे सचिव शिरीष जोशी उपस्थित होते. उपाध्यक्ष विकास अहिर यांनी आभार मानले.