शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

राजू भोसलेंचे क्रशर उद्ध्वस्त करावे लागतील

By admin | Published: February 19, 2017 11:11 PM

उदयनराजेंचा परळीत इशारा : ज्यांच्याकडे साधी सायकलही नव्हती त्यांच्याकडे घोडागाड्या कुठून आल्या ?

सातारा : ‘मी सत्तेपेक्षा सत्याला आणि सामान्य जनतेला महत्त्व देत आलो आहे. आजपर्यंत जे झाले ते झाले. परंतु ज्यांच्याकडे सायकल नव्हती त्यांच्याकडे गाड्या-घोडी आली कुठून याची चौकशी लावली जाईल. उरमोडीच्या धरणाजवळ असलेल्या अनधिकृत क्रशर आणि बंगला उद्ध्वस्त करण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात येईल. दहशत-दहशत म्हणून प्रचार करणाऱ्यांना दहशत आणि दादागिरी काय असते ते दाखवून दिले जाईल,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. परळी, ता. सातारा येथील सातारा विकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. कारी गटातील उमेदवार राजश्री महेंद्र शिंदे व कारी गणामधील तानाजी खामकर आणि अंबवडे गणातील उमेदवार कोमल भंडारे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकूभाऊ भोसले, बबनराव देवरे, वसंत भंडारे, आर. वाय. जाधव, संभाजी देशमुख, बाळासाहेब अनगळ, नितीन कदम, सुरेश दळवी, मोहन राऊत, सुमित काठाळे, सौरभ बोबडे, वैभव पानसरे, आनंदा गाढवे, गणेश गायकवाड, जितेंद्र दळवी, पंकज पाटील, दिलीप गंगावणे, काका कोठावळे, राजू एकबोटे, मोहन जांभळे, रामदास कोकरे, संतोष राऊत, शाम पानसरे, भैया मुलाणी आदी उपस्थित होते. आज मला बाजूला केलं असे आमदार म्हणतात. तथापि, विरोधकांच्या पोस्टर्सवर जेवढे चेहरे आहेत त्या सर्वांना आम्ही वेळोवेळी हिसका दाखविला आहे, हे लक्षात असू द्यात, असे स्पष्ट करून खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कुणावर अन्याय होत असेल तर मला सहन होत नाही. ज्याच्यावर अन्याय होतोय आणि पोलिसही काही करीत नसतील तर मला गप्प राहता येत नाही. त्यावेळी न्याय देण्याचे काम मी केले तर ती दहशत म्हणत असाल तर असली दहशत मी निश्चित करतो. कारी गटाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खासदार निधी वाटप केला आहे. कुणाला खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामधून माहिती घ्यावी. मी नुसते बोलत नाही तर जे बोलतो ते करून दाखवत असतो. तसेच सातारा-कास हा रस्ता अन्युटी प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करून मंजूर करून घेतला आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.’ (प्रतिनिधी) आमदार शहरातून संपले...‘विरोधकांना विकास म्हणजे काय असतो हे माहिती आहे का? हा खरा सवाल आहे. नुसता राजूचा विकास झाला म्हणजे संपूर्ण परळी खोऱ्याचा विकास झाला अशी यांची विकासाची व्याख्या आहे. प्रचंड प्रमाणात गैरकारभार करून, खोटी कामे दाखवून त्यांनी प्रचंड माया कमावली आहे. यांच्या सर्व भानगडी आता मीच मांडणार आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे हे आमदार शहरातून संपले आहेत. शाहूनगर आणि शाहूपुरीत त्यांना विचारत नाहीत,’ असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.