सांगली : शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असल्याने खासदार राजू शेट्टी यांना परिक्रमा किंवा जलसमाधी आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांची आम्हाला गरज आहे, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याचा निर्णय २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेऊ नये. त्यांची आम्हाला गरज आहे. त्यांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही.
मदतीबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. २०१९ च्या मदतीप्रमाणे शेतकऱ्यांना, पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. शेट्टी यांना याबाबतची कल्पनाही दिली होती. तरीही, ते का आंदोलन करीत आहेत, हे कळत नाही.