अशोक पाटीलइस्लामपूर : कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात वलय असलेल्या महाडिक कुटुंबातील माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी भाजपमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यांच्यापुढे आवाहन उभे राहिले आहे. महाडिक यांच्या प्रचारासाठी पेठ नाक्यावरील राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक या दोन बंधुंनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील असे तीन, भाजपचे आमदार डॉ.सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ हे दोन, काँग्रेसचे डॉ.विश्वजीत कदम व विक्रम सावंत हे दोन व शिवसेनेचे आमदार अनिल बाबर असे एकूण आठ आमदार आहेत. संजय पाटील भाजपचे खासदार आणि धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार आहेत.
महाआघाडीतील एखादा आमदार फोडण्यात भाजप यशस्वी होईल का, हा कळीचा मुद्दा आहे. यामध्ये पेठ नाक्यावरील महाडिक बंधुंना आपली ताकद दाखवावी लागेल. यांच्या साथीला एक खासदार दोन आमदार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांची ताकद आहे, परंतु पालकमंत्री जयंत पाटील यांची फिल्डिंग महत्त्वाची आहे.
एकीकडे राज्यात सत्ता आणि धनशक्ती तर दुसरीकडे केंद्रात सत्ता आणि धनशक्ती एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पेठ नाक्यावरील महाडिक बंधू यांनी खान्देश, मराठवाडा या ठिकाणी आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.
ताकद पणालाकोल्हापूर जिल्हा महाडिक यांचा बालेकिल्ला मानला जातो, परंतू या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद आहे. सोलापूर जिल्ह्यातही भाजप आणि महाडिक यांची ताकद कितपत यशस्वी होते ते पाहावे लागेल.