मिरज शहर पोलीस ठाणे ते बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत आयोजित रॅलीत मिरज हायस्कूल, करमरकर हायस्कूल, ज्युबिली कन्या शाळा, आर. एम. हायस्कूल, आयडियल स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, दत्ताजीराव पाटील विद्यालय या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वाहतूक नियमांचे फलक घेऊन सहभागी होते. बालगंधर्व नाट्यगृहात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अशोक वीरकर, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वास राय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. रिक्षाचालकांना रिक्षावर चिकटवण्यासाठी वाहतूक स्टिकरचे वाटप व वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणारे चित्ररथ व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले. पोलीस उपाधीक्षक अधिकारी अशोक वीरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, मिलिंद पाटील, सहायक निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, नीरज उबाळे, प्रज्ञा देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वास राय, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक निरीक्षक अनिल माने यांनी आभार मानले.
फाेटाे : १० मिरज ०६