लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : येथील कबुतर मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबुतर स्पर्धेत सांगली येथील राम शिंदे यांच्या कबुतराने ९ तास ३५ मिनिटांचे आकाशभ्रमण करीत ५१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूरसह बारामती परिसरातील १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जवळपास महिनाभर हे कबुतर उडान सुरु होते. वाठार (ता. हातकणंगले) येथील बागल पटाईत यांच्या ९ तास २६ मिनिटे आकाशभ्रमण करणाऱ्या कबुतराने द्वितीय क्रमांकाचे २१ हजार रुपये जिंकले, तर मिरज येथील राम साळुंखे यांच्या कबुतराने ९ तास ८ मिनिटांची भ्रमण वेळ नोंदवत १२ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. ७ कबुतरांच्या गटात मिरजेच्या ईर्शाद मुजावर यांच्या कबुतराने एकूण ४६ तास २ मिनिटांचे आकाशभ्रमण करुन ७ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. कवलापूरच्या राकेश मोहिते यांच्या कबुतराने चौथ्या क्रमांकाचे ७ हजार रुपये मिळविले.उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, कृष्णा कारखान्याचे संचालक संजयकाका पाटील, माजी नगरसेवक शिवाजी पवार, राजेंद्र पवार, अजित पाटील, रघुनाथ खांबे, नंदू बागल यांच्याहस्ते विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. मौलाना मुंडे, राजू धोत्रे, जहॉँगीर मुंडे, रमेश मदने, दस्तगीर मुंडे, संतोष पिसाळ, अमीर मुंडे, विश्वास नाईक, साहिल मुंडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. जयवंत पाटील, निवास कळसे यांनी सूत्रसंचालन केले.
राम शिंदे यांचे कबुतर राज्यात अव्वल
By admin | Published: May 31, 2017 11:21 PM