कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील शतकमहोत्सवी कसबे डिग्रज विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बाळासाहेब मासुले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडीसाठी रमेश काशीद यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेश चव्हाण, आर.ए. पत्रेमीठ, संस्थेचे सचिव संजय साळुंखे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव नलवडे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष रमेश काशीद यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश काशीद म्हणाले की, डिग्रजची विकास संस्था आदर्श आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे.
यावेळी मावळते अध्यक्ष बाळासाहेब मासुले, उपाध्यक्षा वंदना रेगे, संचालक राजाराम चव्हाण, विपुल चोगुले, कुमार लोंढे, अजित आपटे, शिवशंत चव्हाण, वर्धमान अवधूत, फिरोज तांबोळी, भानुदास सलगर, शोभा उदगिरे, सचिव संजय साळुंखे, सर्व संचालक उपस्थित होते.
फोटो ओळ : कसबे डिग्रज सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रमेश काशीद यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे यांनी सत्कार केला.