शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

By admin | Published: July 10, 2017 11:27 PM

रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘एकवीस वर्षे लाल दिवा असताना प्रत्येक वर्षी नीरा-देवघर कालव्याचे दरवर्षी दीड किलोमीटरचे जरी काम रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले असते तर आज या कालव्याचे काम पूर्ण होऊन फलटण तालुक्याचा दुष्काळ हटला असता. मात्र, लाल दिव्यासाठी बारामतीकरांची लाचारी पत्करून रामराजेंनी फलटण तालुक्याच्या हक्काचे ८० टक्के पाणी बारामतीला विकल्याचा आणि येथील जनतेची फसवणूक केली आहे. रावणाला जसा सत्तेचा उन्माद चढला होता. तसा रामराजेंना सत्तेचा उन्माद चढला आहे,’ असा घणाघात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.नीरा-देवघर कालव्यांची कामे पूर्ण व्हावी, हक्काचे पाणी फलटण, माळशिरस तालुक्याला मिळावे यासाठी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर नेतृत्वाखाली नीरा-देवघर कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्यानंतर गजानन चौक येथे आयोजित जाहीर सभेत आ. जयकुमार गोरे बोलत होते.यावेळी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोऱ्याचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, अ‍ॅड. नरसिंह निकम, शिवाजीराव फडतरे, सिराज शेख आदी उपस्थित होते.फलटण तालुक्यातील जनतेने १९९५ सालापासून रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती आजअखेर एकतर्फी सत्ता दिली. मोठे प्रेम दिले. मात्र, स्वत:ला आधुनिक भगिरथ म्हणवून घेणाऱ्या रामराजेंनी धोम-बलकवडीच्या फक्त एक टीएमसी पाण्याची टिमकी वाजवून ज्याच्यापासून जास्त फायदा आहे. त्या नीरा-देवघरच्या कालव्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले. काहीही संबंध नसताना व फक्त हे पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्याच्या हक्काचे असताना बारामतीला सत्तेच्या हव्यासापोटी पाणी दिले आहे. कागदोपत्री ६० टक्के पाणी बारामतीला दिले हे दाखवत असले तरी ८० टक्के पाणी बारामतीला पळवून नेले जात आहे. याला रामराजे जबाबदार असून, त्यांनी फलटण, खंडाळा तालुक्यांतील जनतेची घोर फसवणूक करून स्वत: सत्तेची ऊब भोगल्याची टीका आ. गोरे यांनी केली.‘माझ्या डोक्याच्या नादी लागू नका,’ असे वारंवार म्हणणाऱ्या रामराजेंचे डोके बारामतीला जात असताना का चालत नाही. हिम्मत असेल तर बारामतीला जाणारे पाणी अडवून दाखवा, मी तुमचा स्वत: हार घालून सत्कार करीन,’ असे आव्हान आ. गोरे यांनी दिले.मी फलटणकरांच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होणार असून, विधानसभेतही नीरा-देवघरच्या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे आ. गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.१६ जुलैला रास्ता रोको : हिंदुराव नाईक-निंबाळकरनीरा-देवघरच्या पाण्यासाठी आजचा हा मोर्चा असून, हा पहिला टप्पा आहे. दि. १६ रोजी लोणंद ते फलटण येथून माळशिरसपर्यंत रास्ता रोका आंदोलन करण्यात येणार आहे. आता नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावर आता माघार नाही. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत लढा देणार असून, बारामतीला पाणी देणाऱ्या रामराजेंना जाब विचारण्याचे आवाहन माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केली.केवळ सत्ता भोगण्यात धन्यता : रणजितसिंह‘रामराजे यांनी आतापर्यंत फलटणच्या जनतेला पाणी प्रश्नावर भुलवून स्वत: सत्ता भोगण्यात धन्यता मानली आहे. काहीही संबंध नसताना बारामतीकर पाणी पळवून नेत असताना रामराजे चकार शब्द बोलत नाही. एवढी लाचारी त्यांनी सत्तेच्या मोहापायी पत्करली आहे. फलटणंच्या जनतेला पाणी प्रश्नावर फसविणाऱ्या रामराजे यांना येथील जनता हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोला यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लगावला.