जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. ३१ डिसेंबरला छाननी होईल. ४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान, तर १८ जानेवारीस मतमोजणी होईल. निवडणुका होणाऱ्या सर्वाधिक ३९ ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात आहेत. जतमधील ३०, मिरज २२, खानापूर ११, कडेगाव ९, आटपाडी १०, पलूस १४, कवठेमहांकाळ १०, शिराळा आणि वाळवा तालुक्यांतील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी, स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीला थेट निधी मिळण्याचे प्रमाण वाढत असताना तेथील सत्ता महत्त्वाची असल्याचे मानले आहे. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अनेकांनी तयारी केली आहे. सर्व दाखले, कर भरल्याच्या पावत्या घेतल्या आहेत.
चौकट -
असा आहे निवडणूक कार्यक्रम
-उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी : दि. २३ ते ३० डिसेंबर
-अर्जाची छाननी : ३१ डिसेंबर
-अर्ज मागे घेण्याचा कालावधी : ४ जानेवारी
-मतदान : १५ जानेवारी सकाळी ७.३० ते ५.३०
-मतमोजणी : १८ जानेवारी