सांगली : राणी चेन्नम्म एक्सप्रेसचा विस्तार सांगलीरेल्वे स्थानकापर्यंत करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय फलदायी ठरला आहे. दररोज ६३ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न रेल्वेला लाभत असून वर्षाकाठी साडे तीन कोटीची भर उत्पन्नात पडेल, असा अंदाज आहे.सांगली-बंगळुरू चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वे स्थानकाला पहिलीच एक्सप्रेस मिळाली आहे. यापूर्वी एकही एक्सप्रेस सांगलीतून सुटत नव्हती. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.सांगली-बंगळुरू चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वे स्थानकाला पहिलीच एक्सप्रेस मिळाली आहे. यापूर्वी एकही एक्सप्रेस सांगलीतून सुटत नव्हती. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.सांगली रेल्वेस्थानकावरून सकाळी सात वाजता बेंगलोर गाडी गेल्यानंतर दिवसभर, तसेच रात्रीही हुबळी, बंगळुरू व कर्नाटकच्या दिशेने जाणारी गाडी नव्हती. सांगली शहर व स्टेशननजीक असणाऱ्या हळद, बेदाणा, गूळ बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम होत होता. ही गैरसोय आता राणी चेन्नम्मा एक्सप्रेसमुळे दूर झाली आहे.
राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंतचा विस्तार फलदायी; उत्पन्नात किती कोटीची भर पडणार..जाणून घ्या
By अविनाश कोळी | Published: April 08, 2024 4:57 PM