शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 5:24 PM

सदानंद औंधे मिरज : राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी ...

सदानंद औंधे

मिरज : राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे. परळी-मिरज डेमूसुद्धा सांगलीतून धावण्यास सुरुवात झाल्याने सांगलीतील प्रवाशांची सोय झाली आहे.गेली २५ वर्षे मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकाची निर्मिती झाल्यापासून प्रथमच या स्थानकातून एखादी एक्स्प्रेस धावणार आहे. सांगली स्थानकातून आतापर्यंत केवळ पॅसेंजर गाड्या सुटत होत्या. सांगलीजवळ दहा किलाेमीटर अंतरावर मिरज जंक्शन असल्याने सर्व एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येतात. मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मासह इतर काही एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरात नेण्यात आल्या. मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली स्थानकातून एकही एक्स्प्रेस सोडण्यात आली नव्हती. आता राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्याने सांगली स्थानकालाही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात जागा मिळाली आहे. नवीन बदलानुसार बंगळुरूतून सुटणारी गाडी क्र. १६५८९ बेंगळुरू-सांगली राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस बंगळुरूहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता मिरजेला पोहोचून १२:३० वाजता सुटेल व दुपारी सांगलीला १२:५० वाजता सांगलीत पोहोचणार आहे. मंगळवार, १२ मार्चपासून ही गाडी सांगलीपर्यंत सुरू झाली आहे.बुधवार, १३ मार्चपासून सांगलीहून सुटणारी गाडी क्र. १६५९० सांगली-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस सांगलीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. ही एक्स्प्रेस सांगलीतून दुपारी ३ वाजता सुटेल. मिरजेत दुपारी ३:१५ वाजता पोहोचून ३:३५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२० वाजता बंगळुरूला पोहोचेल. १३ मार्चपासून परळीतून सुटणारी गाडी क्र. ११४११ परळी-सांगली डेमू परळी येथून सकाळी ८:१५ वाजता सुटेल. मिरजला सायंकाळी ६:२० वाजता मिरजेत पोहोचून ६:३० वाजता सुटेल व ६:५० वाजता सांगलीत पोहोचेल.याशिवाय १३ मार्चपासून सांगलीतून सुटणारी गाडी क्र. ११४१२ सांगली-परळी डेमू सांगलीहून रात्री ८:३५ वाजता सुटून ८:५० वाजता मिरजला पोहोचून रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ वाजता परळीला पोहोचेल. 

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे