दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री निधीला मदतीचा धनादेश पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी रावसाहेब पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी महावीर जयंती घरीच साजरी केली. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, घरीच पंचामृत अभिषेक, प्रतिमा पूजन आणि अष्टक घातले.
कोविड विरोधातील मोहिमेसाठी मुख्यमंत्री निधीला ५१ हजार रुपयांची मदत दिली. त्याचा धनादेश काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपुर्द केला.
रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जबाबदारीचे भान राखथ संपूर्ण जैन समाजाने शासनाच्या आवाहनाचा आदर केला. घरोघरी जयंती साजरी केली. पृथ्वीराज पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाला निधी दिल्याबद्दल आभार मानले.