ओळ : सांगली शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी रावसाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, औषध उद्योग अशा विविध क्षेत्रांत कार्यरत रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील पूरग्रस्त भागात औषध फवारणी करण्यात आली. सांगलीत शामरावनगर येथील अंगणवाडीत शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्थेच्या वतीने सर्व शाखांमधून वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त रावसाहेब पाटील यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) बोरगावकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. सांगली शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भिलवडीचे माजी सरपंच विजय चोपडे, उद्योजक भालचंद्र पाटील, समडोळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव नितीन खाडिलकर, एन. डी. बिरनाळे, विनोद पाटोळे, राजगोंडा पाटील, महावीर पाटील, राजू चौधरी, मिलिंद चौधरी, प्रा. एम. एस. रजपूत, जैन बोर्डिंगचे अध्यक्ष राहुल चौगुले, शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील व पदाधिकारी, सागर वडगावे, सुनील पाटील यांनीही रावसाहेब पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या.