शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

बलात्कारातील संशयितांची बडदास्त

By admin | Published: November 02, 2014 10:02 PM

‘सिव्हिल’मधील प्रकार : संशयितांना मोबाईल; नातेवाईकांचा गराडा

सांगली : बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन संशयितांचा वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली सांगलीच्या शासकीय रुग्णालयात बडदास्त ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. रविवारी सायंकाळी संशयितांभोवती नातेवाईकांनी गराडा घातला होता. पोलिसांच्या साक्षीने संशयित मोबाईलवर दिलखुलास गप्पा मारत होते.संशयित पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक आहेत. आईचे निधन झाले आहे. ती आजी व वडिलांसोबत राहते. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत संशयितांनी तिच्यावर गेले वर्षभर वेळोवेळी बलात्कार केला होता. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर संशयितांनी तिला वाऱ्यावर सोडले. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. मुलीच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक केली होती. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत.अरविंद पवार, पंकज पवार, सचिन जाधव या संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी पलूस पोलिसांनी रविवारी शासकीय रुग्णालयात आणले होते. आकस्मिक दुर्घटना विभागाबाहेरील बाकड्यावर तिघांना बसविले होते. सोबत एक पोलीसही बसला होता. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये एक महिलाही होती. नातेवाईकांनी पोलिसांसमोर संशयितांना मोबाईल दिला होता. संशयित एकापाठोपाठ एक असे मोबाईलवर दिलखुलास गप्पा मारत बसले होते. नातेवाईकांशी त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. दीड तास हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. गेले दोन दिवस संशयितांना रुग्णालयात आणले जात आहे. (प्रतिनिधी)मुलीचे वडील शांतपीडित मुलीचे वडील तिच्या देखभालीसाठी रुग्णालयात आहेत. या प्रकारामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. सायंकाळी तेही आकस्मिक दुर्घटना विभागाजवळ एका कोपऱ्यात बसून होते. संशयितांची पोलिसांनी ठेवलेली बडदास्त ते पाहत बसले होते.