शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 AM

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना माणुसकीच्या रक्तातून नव्या नातेविश्वात घेऊन जाण्याचे काम ‘बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनमार्फत’ अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच भावनेतून राजस्थानमधील एका सोळावर्षीय शाळकरी मुलीला पुण्यातून विमानाने सहा तासात रक्त उपलब्ध करून देऊन तिचे प्राण वाचविले.अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटातील संपूर्ण देशभरातील लोकांची संघटना बांधण्याचे काम तासगाव (जि. सांगली) येथील विक्रम यादव यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात विविध राज्यांमधील तसेच परदेशातील रुग्णांचे प्राण त्यांनी त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून वाचविले आहेत. यात आणखी एका पुण्यकर्माची भर नुकतीच पडली. किशनगंज (जि. बारां, राजस्थान) येथील किशोरी मनभर या सोळावर्षीय मुलीला गावातील आरोग्य शिबिरातच अ‍ॅनिमिया आणि मलेरिया या दोन्ही आजाराने ग्रासल्याचे आढळले. तिला तातडीने कोटा शहरातील महाराव भीमसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिच्या तपासणीत ‘बॉम्बे ओ’ हा दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळला. एकीकडे आजाराने ग्रस्त असताना, दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळल्याने डॉक्टरांची चिंता वाढली. तिचे हिमोग्लोबिनही ४ मिलिग्रॅमपर्यंत खाली आले होते.राजस्थानसह शेजारील अन्य राज्यांमध्ये त्यांनी चौकशी केली असता, हा रक्तगट त्यांना कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनच्या हेल्पलाईन क्रमांकावरून सांगलीच्या विक्रम यादव यांच्याशी संपर्क साधला आणि सहा तासात मुलीला रक्त हवे असल्याचे सांगितले. यादव यांनी आपली यंत्रणा कार्यान्वित केली. पुण्यातील रक्तदाते मेधा वैद्य आणि प्रतीक माथी या दोघांना त्यांनी पुण्यातच रक्तदान करण्यास सांगितले. विमानाने ते रक्त जयपूरपर्यंत नेले आणि तिथून कारने कोटा येथील हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. वेळेत रक्त पोहोचल्यामुळे किशोरी मनभरचे प्राण वाचले.विक्रम यादव यांनी डॉक्टरांमार्फत या मुलीशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि तिची चौकशीही केली. या मुलीने यादव यांना धन्यवाद दिले. तिच्या चेहºयावर फुललेले हसू डॉक्टरांच्या मनातील समाधानाच्या लाटांना उधाण आणणारे ठरले. हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. एच. एल. मीणा यांनीही यादव, वैद्य आणि माथी यांना धन्यवाद दिले.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांसाठी सहजासहजी हे रक्त उपलब्ध होणे कठीण असते. त्यामुळेच यादव यांनी देशभरातील अशा गटातील लोकांची संघटना बांधली आहे. त्याचा हेल्पलाईन क्र. ९९७00१८00१ हा आहे.खर्च नव्हे, जीव महत्त्वाचा : विक्रम यादवगेल्या काही वर्षांपासून पदरमोड करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशन व त्यांचे रक्तदाते करीत आहेत. राजस्थानला रक्त पाठविण्याचा खर्चही संघटनेनेच केला. याविषयी यादव म्हणाले की, खर्चापेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा असतो. चांगल्या विचाराचे रक्तदाते आम्हाला लाभल्यामुळे या गोष्टी शक्य होत आहेत.यांनी केली धडपड...रक्त पोहोचविण्याच्या मोहिमेत विक्रम यादव यांच्यासह हरजिंदर सिंह, सचिन सिंगला, अलोक पदकर, सागर पंडित, पुणे जनकल्याण रक्तपेढीचे संतोष अनगोळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.