लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या सांगलीतील आढावा बैठकीत शुक्रवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी विविध खात्यांच्या अधिकाºयांची खरडपट्टी काढली. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, सात-बारा संगणकीकरण, गौण खनिज कामात कुचराई केल्यास घरी घालविण्याचा इशाराही दिला. सामाजिक वनीकरणच्या अधिकाºयांना, तुमचे कुठेच काम दिसत नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला.जिल्हाधिकाºयांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मंत्री सुभाष देशमुख यांनी, ‘साहेब जरा सबुरीने घ्या. अधिकारी, कर्मचाºयांना थेट घरी नको. सांभाळून घेऊन त्यांना प्रोत्साहन द्या’, अशी सूचना दिली.बैठकीत सुरुवातीलाच जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा विषय चर्चेत आला. यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी, जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा आढावा दिला. मंत्री देशमुख यांनी, जलयुक्त शिवार योजनेच्या कामात जिल्हा मागे असल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी मागील वर्षी कामात हयगय झाल्याचे कबूल करीत, पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन चांगले केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना सक्त सूचना दिल्या आहेत. कामात कोणत्याही प्रकारची कुचराई झाल्यास जिल्ह्यात ठेवणार नाही, असा इशारा अधिकाºयांना दिला.वृक्ष लागवडीचा विषय चर्चेला आल्यानंतर सामाजिक वनीकरण अधिकारी यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी, तुमचे काम समाधानकारक नाही. वृक्ष लागवडीचे केलेले काम कुठेच दिसत नाही. वन खात्याचे काम चांगले आहे. मात्र तुमच्याबद्दल खूपच तक्रारी येत आहेत. तुमची बोगस कामे असल्याच्या जिल्ह्यातील चार आमदारांच्याही तक्रारी आहेत. कामाची गुणवत्ता सुधारली नाही, तर मला कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. मंत्री देशमुख यांनीही कामात सतर्क राहण्याचे आदेश दिले.सात-बारा संगणकीकरणाचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी यांनी, हे काम जिल्ह्यात कमी झाल्याची कबुली दिली. याला महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचे सांगितले. पण यात आता सुधारणा करण्याची वेळ आली आहे. राज्यात जिल्ह्याचा नंबर खालून तिसरा, चौथा आहे, हे भूषणावह नाही. प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीदार यांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, तसेच मंडल अधिकारी, तलाठी यांनी काम न केल्यास घरी पाठविण्यात येईल, असा इशारा काळम-पाटील यांनी दिला.वाळू तस्करीची माहिती सांगताना आमदार शिवाजीराव नाईक यांनी, पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षाने पाणी योजनांच्या खोदलेल्या कालव्यांच्या दोन्ही बाजूला पडलेल्या गौण खनिजाची लूट सुरु आहे. काहींनी तर क्रशर सुरु केले आहेत. यांच्यावर कारवाई कधी करणार?, असे विचारले. यावर पाटबंधारे अधिकाºयांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी, संबंधित ठिकाणचे अधिकारी पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी कर्जमाफीचा आढावा घेण्यात आला. कोणीही अपात्र शेतकºयांना याचा लाभ मिळू नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी, प्रधानमंत्री आवास योजनेची व महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मनपाच्या विकास कामांची माहिती सांगितली. मनपा हागणदारीमुक्त झाल्याचे खेबूडकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे झिरो पेंडन्सीचे काम अत्यंत चांगले असून जिल्हाधिकारी कार्यालय आयएसओ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेसाठी तरतुदीचा विषय चर्चेला आला, पण त्यावर तोडगा निघू शकला नाही.बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, अश्विनी जिरंगे, किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.वसंतदादा बँकेची इमारत मनपा कार्यालयासाठी वापरामहापालिकेच्या इमारतीसाठी जागेचा विषय चर्चेला आल्यानंतर मंत्री देशमुख म्हणाले, महापालिकेची ३३ कोटी रुपयांची ठेव वसंतदादा बँकेत आहे. ही बँक आता बुडाली आहे. वसुली होणे शक्य नसेल, तर महापालिकेने ही इमारत ताब्यात घ्यावी. तसेच येथे एखाद्या विभागाचे कार्यालय सुरु करावे.सिंचन योजनांच्या पंप दुरुस्तीवरून मतभेदसिंचन योजनांचे अनेक पंप नादुरुस्त असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी नापसंती व्यक्त केली. यामुळे योजनांचे पाणी पूर्ण क्षमतेने पुढे जात नाही. पंप दुरुस्त करुन घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर पाटबंधारे अधीक्षक हणमंत गुणाले यांनी, सध्या १४ पंप सुरु आहेत. २० पंप लवकरच सुरु होतील. आठ पंपांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागणार आहे. ते पूर्णपणे बदलावे लागतील. पण सध्याच्या क्षमतेवरून पाणी पोहोचण्याच काही अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.‘टेंभू’साठी सौरऊर्जा प्रकल्पटेंभू योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी खानापूर तालुक्यात ३०० एकरवर महाजनको प्रकल्प उभा करणार आहे. त्यातून ६३.२० मेगावॅट वीज उत्पादन होणार आहे. प्रकल्पाच्या आवश्यकतेपैकी हा २२.५० टक्के वीज पुरवठा आहे. हे काम लवकरच सुरु होणार आहे, असे सुभाष देशमुख व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
अधिकाºयांची जिल्हाधिकाºयांकडून खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:11 AM