इस्लामपूर येथे दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, किरण उथळे, मोहसीन पटवेकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : दुधाच्या पडलेल्या दरावरून आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील पेठ रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चाबूकफोड आंदोलन करण्यात आले. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुधाची आंघोळ घालण्यात आली.
गायीच्या दुधाला प्रतिलीटर ३० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलीटर ५० रुपयांचा दर मिळावा. हा दर देण्यासाठी या सरकारला सुबुद्धी सुचावी, असे आवाहन करीत रयत क्रांती संघटनेने हे आंदोलन केले. दूध दरवाढीबद्दल लवकर निर्णय घेतला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी दिला.
या वेळी बजरंग भोसले, किरण उथळे, मोहसीन पटवेकर, नंदकुमार पाटोळे, लालासाहेब धुमाळ, रोहन बाबर, विक्रांत गोंदकर, सर्फराज डाके, जितेंद्र सूर्यवंशी, स्वप्निल सूर्यवंशी, अजय जगताप, स्वप्निल लोहार, महंमद इबुसे, अनिल पाटील, अभिनव उबाळे, राहुल सुतार आदी उपस्थित होते.