सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत सोमवारी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली. दिवसभरात १२२३ नवे रुग्ण आढळून येतानाच परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील २० अशा २१ जणांचा मृत्यू झाला. ९०० जण काेरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे नवीन दोन रुग्ण आढळले. महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या घटतानाच वाळवा तालुक्यात मात्र माेठी वाढ झाली.
जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ४, मिरज २, वाळवा ६, तासगाव ३, आटपाडी, जत, खानापूर, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवित सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत ५०४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४९५ जण बाधित आढळले. रॅपिड ॲंटिजनच्या ९४३३ जणांच्या नमुने तपासणीतून ७४२ जण पॉझिटिव्ह आढळले.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात सध्या दहा हजार ११४ जण उपचार घेत आहेत त्यातील १००१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८४९ जण ऑक्सिजनवर तर १५२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला तर १४ नवे रुग्ण दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,५८,२२१
उपचार घेत असलेले १०,११४
काेरोनामुक्त झालेले १,४३,८१२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४२९५
पॉझिटिव्हिटी रेट ९.८०
सोमवारी दिवसभरात
सांगली ८३
मिरज २१
आटपाडी ९५
कडेगाव १०८
खानापूर ८९
पलूस ८४
तासगाव १३९
जत ५५
कवठेमहांकाळ ६२
मिरज तालुका १२५
शिराळा ३९
वाळवा ३२३