आयुक्त कापडणीस म्हणाले, गेल्या दोन आर्थिक वर्षांत महापूर आणि कोविड काळात नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते. त्यामुळे महापालिकेचा मालमत्ता कर नागरिकांना भरता आला नाही. यामुळे नागरिकांच्या मालमत्ता कराच्या दंड, शास्तीमध्ये वाढ होत गेली होती. महापालिकेने नागरिकांना कर भरण्यात सवलत मिळावी, या उद्देशाने सवलत योजना लागू केली आहे. या योजनेत नागरिकांना मालमत्ता व अन्य करांच्या दंड, शास्तीमध्ये १०० टक्के माफी दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंतच सुरू राहणार असून, त्यानंतर ही योजना बंद केली जाणार आहे.
त्यामुळे ज्या नागरिकांची घरपट्टी थकीत आहे, त्यांनी योजनेचा लाभ घेऊन दंड, शास्ती माफी करून भरून सहकार्य करावे. ३१ मार्चनंतर जे नागरिक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्ती, मालमत्तेला महापालिकेचे नाव लावणे यांसह प्रसंगी मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी दंड, शास्ती माफी घेऊन थकीत मालमत्ता कर वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.