शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 4:43 PM

सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच ...

सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. तिकीट नाकारल्यास जयश्रीताई समर्थकांनी बंडखोरी आणि पृथ्वीराज पाटील समर्थकांनी लोकसभेप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा सूतोवाच करण्यात आले.विधानसभेच्या सांगली मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच अजून सुटलेला नाही. माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम व काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये समेट घडविण्यासाठी सलग दोन दिवस बैठक घेतली; परंतु दोघेही निवडणूक लढविण्यार ठाम असल्याने उमेदवारीचा निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात सोडला आहे; मात्र जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

..तर पक्षाला जिल्ह्यात फटका बसेलजयश्रीताई पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोमवारी बैठक घेतली. जयश्रीताईंना उमेदवारी मिळाली नाही, तर त्याचा फटका संपूर्ण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला बसेल, असा इशारा देत बंडखोरीचे संकेत दिले. यावेळी डॉ. जितेश कदम, माजी महापौर किशोर शहा, ज्येष्ठ कार्यकर्ते सिकंदर जमादार, अनिल अमटवणे, तानाजी पाटील, सुभाष खोत, खंडेराव जगताप, महावीर कागवाडे, उज्ज्वल शिंदे, कपिल कबाडगे, रणजित देसाई, श्रीमंत पाठरे आदी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये महिलांना तिकिटासाठी असा संघर्ष करावा लागत असेल तर तो योग्य नाही, अशी मते कार्यकर्त्यांनी मांडली.

..तर लोकसभेप्रमाणे अपक्षाचा ‘सांगली पॅटर्न’पृथ्वीराज पाटील समर्थकांची बैठक मंगळवारी सांगलीत झाली. काँग्रेसची उमेदवारी देताना पृथ्वीराज पाटील यांच्यावर अन्याय झाला. तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा इशारा समर्थकांनी बैठकीत दिला. माजी नगरसवेक रज्जाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉ. राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अजय देशमुख, शीतल, सदलगे, अजिज शेख आदी उपस्थित होते. आम्ही अपक्ष निवडणूक लढविली तरी विश्वजित कदम व विशाल पाटील हेच आमचे नेते असतील, अशी भूमिका आशिष कोरी यांनी मांडली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेस