बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील संदीप आप्पासाहेब कदम यांनी ३५ गुंठे शेतात तब्बल ९५ टन ऊस उत्पादन घेत युवा शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
पारंपरिक पद्धतीने पीकपूर्व मशागत करताना त्यांनी ८ ते ९ ट्रेलर शेणखताचा तसेच कंपोस्ट खताचा वापर केला. साडेचारफुटी सरीवर ८६०३२ या बियाणाचा वापर केला. माती परीक्षणानुसार खताचा डोस, औषध फवारणी, वेळेवर आळवणी, प्रमाणबद्ध खते व पाण्याचे योग्य व्यवस्थापन याच्या जोरावर त्यांनी हे भरघोस उत्पादन मिळविले. ऊस तोडण्यासाठी एका उसाला ४७ ते ४८ कांड्या होत्या. ३६०३२ हा ऊस राजारामबापू कारखान्यासाठी गाळपासाठी देण्यात आला. कदम यांनी आगामी काळात एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वडील आप्पासाहेब कदम, भाऊ विश्वास कदम यांचे मार्गदर्शन मिळाले.
फोटो - ०९१२२०२०-आयएलएलएम-बोरगाव न्यूज. मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी संदीप आप्पासाहेब कदम उसाच्या ४८ कांड्यासह दिसत आहेत.