शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

By संतोष भिसे | Published: November 02, 2023 4:56 PM

मिरज तालुक्यात संस्थानी मुलुख असल्याने कुणबी नोंदी झाल्याच नाहीत

संतोष भिसेसांगली : मिरज तालुक्यात संस्थानी मुलुख असल्याने कुणबी नोंदी झाल्याच नाहीत. तालुक्याचे रेकॉर्ड १८८०-९० किंवा १९१० नंतरचे मिळते. पण, कुणबीसाठी त्याच्याही मागे जावे लागते. सांगली जिल्ह्यात १९२० नंतर कुणबी दाखले आढळत नाहीत. दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेही लोकांना जात सिद्ध करण्यात अडचणी येत आहेत.त्या काळी जातीची नोंद जन्माच्या उताऱ्यावर व्हायची. गाव कुलकर्णीपदाची जबाबदारी असलेला अधिकारी नोंदी करायचा. एखाद्या घरात मुलाच्या जन्मानंतर एक-दोन दिवस ते कमाल आठवडाभरात नोंद व्हायची. पण, या नोंदींना व्यावहारिक शहाणपणाचा टेकू लागल्याने काहीअंशी गफलती आहेत. एखाद्या जातीची नोंद काही ठिकाणी तेली, तर काही ठिकाणी लिंगायत अशी झाली आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम आता समोर येत आहेत. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी अशी गणना असली, तरी त्याकाळी नोंद घालणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर व अनुभवावरही बऱ्याच नोंदी झाल्या आहेत. काही कुटुंबांत मोठा भाऊ कुणबी, तर लहान भाऊ मराठा अशाही विभिन्न नोंदी आहेत. त्यामुळेच सरसकट कुणबी दाखल्यांची व मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे.सांगलीच्या तुलनेेत कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी नोंदी जास्त प्रमाणात सापडतात. गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील आरक्षणासाठी राजकारण्यांनी याचा वापर सुरू केला. अगदी पैसे मोजूनही दाखले काढण्याचे प्रकार झाले आहेत. अनेक ठिकाणी नामसाधर्म्यावरून दाखले मिळविण्यात आले आहेत.कुणबी दाखले मिळण्याची शक्यता नसल्याने मराठावर जोर दिला जात आहे. पण, मराठ्यांनी कुणबीसाठी ताकद लावली, तर सरकारला सर्व दप्तरे धुंडाळावी लागतील. अर्थात, नोंदी मिळाल्यास मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये नैसर्गिकरीत्या होईल. पण, हे काम अत्यंत गुंतागुंतीचे, किचकट आणि वेळखाऊ आहे.

दप्तर शाखेकडे अक्षम्य दुर्लक्ष

  • दक्षिण महाराष्ट्रात दप्तर शाखांची प्रचंड अनास्था आहे. महसूल विभाग पूर्णत: दप्तरावर चालतो. त्यामुळे हा प्रश्न राज्यभरातही आहे. किंमतही करता येणार नाही अशा जुन्या कागदांना अक्षरश: वाळवी लागली आहे. 
  • शासनाने काही वर्षांपूर्वी जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग केले. त्यासाठी राज्यभरात प्रचंड मोठी मोहीम राबविली. कोट्यवधी कागदांचे स्कॅनिंग केल्याचा डिंडोरा पिटत सांगत स्वत:ची पाठ थोपटली. पण, स्कॅनिंगमधील घोटाळे मात्र दुर्लक्षित केले. 
  • स्कॅनिंगच्या ठेकेदाराने अर्धशिक्षित तरुणांकडून कामे करून घेतली. या तरुणांना मोडीचा कागद उलटा कि सुलटा याचा गंधही नव्हता. पण, शासनाने हे लक्षातच घेतले नाही. पानांचे क्रमही मागेपुढे झाले. 
  • कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात आली. स्कॅनिंग केलेल्या सर्रास कागदपत्रांत नोंदी पुसट दिसतात किंवा दिसतच नाहीत. त्यामुळे ती निरर्थक ठरली आहेत. मोडी वाचकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
टॅग्स :SangliसांगलीCaste certificateजात प्रमाणपत्रMaratha Reservationमराठा आरक्षण