जिल्ह्यात ११ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा जिल्हा परिषद चालवत आहे. या योजना ३० ते ३५ वर्षांच्या कालबाह्य आहेत. यामुळे योजनांना अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे पुरेशा दाबाने गावाना पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीत अडथळे निर्माण झाले आहेत. राजकीय पाठबळामुळे अनेक गावांनी प्रादेशिक योजनेतून बाहेर पडून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना केल्या आहेत. यामुळे सध्या पेड, मणेराजुरी, कवठेमहांकाळ-विसापूर, येळावी, रायगाव या योजना २०१७ पासून बंद आहेत. या योजनांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी तशीच असून ती वसूल करणेही प्रशासनाला कठीण झाले आहे.
कुंडल, कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, नांद्रे-वसगडे, तुंग आणि वाघोली या प्रादेशिक योजना कशा तर चालू आहेत. कुंडल योजनेची तीन कोटी ४६ लाख ५२ हजार ८६ रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ५४ लाख ५३ हजार ७१२ रुपयांची वसुली झाली आहे, पण दोन कोटी ९१ लाख ९८ हजार ३७४ रुपयांची थकबाकी ३१ मार्च २०२१ पर्यंत कशी वसूल होणार आहे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. या योजनेप्रमाणेच अन्य कासेगाव, जुनेखेड-नवेखेडसह अन्य योजनांच्या थकबाकी वसुलीचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
चौकट
जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा लेखाजोखा
योजना मागील थकबाकी यावर्षीचे उद्दिष्ट वसुली टक्केवारी
कुंडल २.३२ कोटी १.१३ कोटी ५४.५३ लाख ४८
कासेगाव ४.७१ कोटी १.२५ कोटी २३.३५ लाख १९
जुनेखेड-नवेखेड २९ लाख १५.२२ लाख ३.८९ लाख २६
नांद्रे-वसगडे १.४८ कोटी १६.९० लाख १०.६२ लाख ६३
तुंग १.५९ कोटी २२.३० लाख १.२२ लाख ६
वाघोली २.६१ लाख २.३१ लाख ५० हजार २२