सांगली : जिल्हा परिषद बांधकाम, सामान्य प्रशासन, आरोग्यसह विविध विभागाकडील रिक्त ७६१ पदांसाठीची भरती सुरू करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून जून महिन्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरतीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषदेकडील भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केलेली आहे. सदर कंपनी बरोबर सामंजस्य करार केला आहे. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली आहे. शासनस्तरावरून भरती परीक्षा घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे. दहा दिवसांत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करध्यात येईल. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध देण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयामधून घेण्यात येणार आहे, असेही जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भरतीबद्दल शंका आहे येथे करा संपर्क२०२३ च्या भरतीकरिता शासनाने वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे. भरतीसंदर्भात परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये. याकरिता जिल्हा परिषद सांगलीकडील फोन नंबर ०२३३-२३७२७२५ वरती संपर्क करायचा आहे.
जिल्हा परिषदेत या पदांची होणार भरतीविभाग - भरतीची पदेअंगणवाडी पर्यवेक्षिका - ०९विस्तार अधिकारी (पंचायत) - ०१कंत्राटी ग्रामसेवक - ५२आरोग्य सेवक (पु.) - १८५आरोग्य सेवक (महिला) - ३६६प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०१आरोग्य पर्यवेक्षक - ०४औषध निर्माण अधिकारी - २३कनिष्ठ सहायक लेखा - ०४कनिष्ठ अभियंता (जलसंधारण) - ३४स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जलसंधारण) - ०३स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम) - २०कनिष्ठ अभियंता (बांधकाम) - ०३कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) - २३पशुधन पर्यवेक्षक - २२विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - ०१विस्तार अधिकारी - ०२