शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 3:01 PM

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ...

ठळक मुद्देनियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासाइंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या सुबत्तेत वाढ होऊन तो आता समृद्ध झाला आहे. यापुढे विद्वत्तेची कास धरून त्यांचा गौरव करण्याची परंपरा जपली पाहिजे. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वांशी आपुलकी जपल्याने या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता आणि गौरव अंकाचे प्रकाशन जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांच्याहस्ते राजारामबापू नाट्यगृहात करण्यात आले.

यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी मॅरेथॉनपटू संग्रामसिंह पाटील, नेदरलँडमध्ये पर्यावरण शाखेचे शिक्षण घेणाऱ्या युगंधर विजयकुमार पाटील, उद्योजक हौसेराव भोसले, सुजित पाटील, रवींद्र पाटील यांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.जयंत पाटील म्हणाले, जुन्या पिढीने कष्टातून, संघर्षातून सहकाराची उभारणी केली. मात्र नव्या पिढीला सहकाराविषयी आपुलकी नाही. इथला सहकार बळकट असल्याने तालुक्यातील माणूस डगमगत नाही, ही सहकाराची ताकद आहे.

वाकुर्डे योजनेचे पाणी जूनपर्यंत शिराळा तालुक्यात तर आॅगस्टमध्ये वाळवा तालुक्यात येईल. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळे सर्वांचा सात-बारा कोरा होईल. नदीकाठच्या शेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय लवकरच होईल.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सामान्य, गरजूंना आर्थिक पाठबळ देत तालुक्यात आर्थिक परिवर्तन केले आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मागील युतीच्या शासनाने सहकारात मोठा गोंधळ घातला. त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. आमचे सरकार या सर्व कायदेबाह्य व्यवस्था बाजूला करणार आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात इंद्रप्रस्थ पतसंस्था २५ वर्षे कार्यरत राहिली, हे मोठे यश आहे. अनेक स्थित्यंतरे आली, तरी इंद्रप्रस्थ संस्थेने सामान्य माणसांचा विश्वास संपादन करत आपला ब्रँड निर्माण केला आहे.अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विश्वास धस यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, प्रशांत थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विनायकराव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, नेताजी पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, प्रसाद तगारे, मोहनराव शिंदे, मेघा पाटील, छाया पाटील, कमल पाटील, अलका शहा, रोजा किणीकर, सुस्मिता जाधव, श्रद्धा चरापले, रंजना बारहते, शहाजी पाटील, बशीर मोमीन, राजारामबापू पाटील, अमोल पारेख उपस्थित होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली