ओळ : टाकळी (ता. मिरज) येथे महामार्गाच्या कामात हटवलेल्या वडाच्या झाडाचे पुनर्राेपण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : टाकळी (ता. मिरज ) येथे सुरू असलेल्या हेरवाड - दिघंची महामार्गाच्या कामात हटवलेल्या १५ वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाचे पुनर्राेपण करण्यात आले.
टाकळी येथे हेरवाड - दिघंची महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्याकडेला पंधरा वर्षांपूर्वी टाकळी येथील काही तरुणांनी वडाच्या झाडाचे रोपण केले होते. यामुळे अनेकांच्या आठवणी या झाडासोबत जोडल्या गेल्या होत्या. महामार्गाच्या कामामुळे हे वडाचे झाड काढण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या १५ वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाचे पुनरुज्जीवन करावे, अशी ग्रामस्थांची इच्छा होती.
त्यानुसार राजपथ इन्फ्राकॉन कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत तोडमल, सहाय्यक व्यवस्थापक लिंबाजी पवार, अभियंता सुनील पाटील, संतोष लाड, ऑपरेटर राजेंद्र कुमार, बाळासाहेब कोळी, पोलीस पाटील संजय माने, ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे, संजय पाटील, शिवाजी वाघमोडे, सचिन गुळवणे यांच्या सहकार्याने पंधरा वर्षांपूर्वीचे वडाचे झाड जेसीबीच्या साह्याने मुळासह काढून त्याचे टाकळी येथील पाणी पुरवठा केंद्राजवळ पुनर्राेपण करण्यात आले.
कोट
राजपथ इन्फ्राकॉन कंपनी नेहमी पर्यावरणपूरक काम करत आहे. कंपनीने टाकळी येथील जुने वडाचे झाड काढून त्याचे नवीन ठिकाणी पुनर्राेपण केले. यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहोत. यासाठी प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत तोडमल, सहाय्यक व्यवस्थापक लिंबाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य, टाकळी ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले.
- सुनील पाटील, अभियंता