फोटो -
भिलवडी (ता. पलूस) येथे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देताना रमेश पाटील, महेश शेटे, दीपक पाटील, दिलीप कोरे आदी.
फोटो -
भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देताना रमेश पाटील, महेश शेटे, दीपक पाटील, दिलीप कोरे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध पाळून व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन भिलवडी व्यापारी संघटनेने आपत्ती व्यवस्थापन समिती व पोलीस प्रशासनाला दिले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव महेश शेटे, दिलीप कोरे, दीपक पाटील, बशीर आत्तार, समीर कुलकर्णी आदींसह पदाधिकाऱ्यांनी भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना लेखी निवेदन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने घालण्यात आलेल्या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. परंतु आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या व्यापारी वर्गाला हे निर्बंध सोसणारे नाहीत. त्यामुळे बंद ठेवण्याचे आदेश दिलेल्या संबंधित व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून अथवा पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. फोटोग्राफर, मटण, चिकन विक्रेते, सर्व्हिसिंग सेंटर, हार्डवेअर आदी सेवा पुरविणारी दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू ठेवावीत. व्यापार बंद करण्यापेक्षा वीकेंड लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्याजोगा आहे. कडक निर्बंध व कडक आर्थिक कारवाईसह हे व्यवसाय सोमवार ते शुक्रवार सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी, सध्या शासन नियमानुसार व्यवसाय सुरू ठेवावेत. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा करून, व्यापाऱ्यांची होणारी परवड थांबविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन भिलवडी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.