शहरातील कांचन पेट्रोल पंपाजवळ तीन फूट उंचीची सिमेंट पाईपची गटर आहे. दोन दिवसांपूर्वी या पाईपमध्ये एक गाढव अडकले. बाहेर पडण्यासाठी हालचाल करण्याच्या नादात ते पाईपमध्ये शंभर फूट आत गेले. नगरपालिकेचे अधिकारी प्रताप घाडगे यांना पाईपमध्ये गाढव अडकल्याचे समजले. मात्र गाढव पाईपच्या आत गेल्याने त्याला घाणीत आत जाऊन काढायचे कसे? हा प्रश्न होता.
अखेर बंद पाईपमधील गाढवाची जागा शोधून सागर जावळे या तरुणाला पाईपमध्ये पाठवले. त्याने आत जाऊन गाढवाचे पाय दोरीने बांधले. दोरीच्या साहाय्याने त्याला ओढत बाहेर काढले. तीन दिवस खायला न मिळाल्याने ते अशक्त झाले होते. पालिकेचे अधिकारी व तरुणांचे कौतुक होत आहे. या मदतकार्यात सागर जावळे, वैभव गेजगे, दादा जाधव यांनी सहभाग घेतला.