आष्टा : आष्टा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिनकर बसुगडे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागी माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुतणे माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे यांचे सुपुत्र धैर्यशील झुंझारराव शिंदे यांची निवड निश्चित आहे. पालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी गटाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आष्टा नगरपरिषदेत माजी आमदार विलासराव शिंदे यांची निर्विवाद सत्ता आहे. नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षासाठी ओबीसी महिलेसाठी असल्याने झिनत आत्तार व रंजना शेळके यांना संधी मिळाली. त्यानंतर खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षण झाल्याने मंगला विलासराव शिंदे यांना संधी मिळाली आहे, तर उपनगराध्यक्ष पदाची संधी जयंत पाटील गटातून शिंदे गटात आलेल्या बाबा सिद्ध यांच्यासह जयंत पाटील गटाचे विजय मोरे, संगीता वारे यांना, तर शिंदे गटाच्या के. टी. वग्याणी, दिनकर बसुगडे यांना मिळाली आहे. पालिका निवडणूक जवळ आल्याने शिंदे घराण्यातील व्यक्तीकडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद असल्यास त्याची पक्षाला मदतच होईल. या दृष्टीने बसुगडे यांनी राजीनामा दिला आहे. (वार्ताहर)
आष्टा उपनगराध्यक्ष बसुगडेंचा राजीनामा
By admin | Published: July 04, 2016 12:18 AM