शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

By admin | Published: January 19, 2017 12:26 AM

निवडणुकीचे वातावरण तापू लागले : बंडखोरीच्या शक्यतेने पक्षश्रेष्ठी अस्वस्थ, बहुरंगी लढत होणार

मोहन बाबर ल्ल येळावीयेळावी जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी पुरुष आरक्षण झाल्याने प्रमुख मातब्बर नाराज झाले आहेत. आरक्षणाअगोदर सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच रान उठविले होते. राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अशी होणारी निवडणूक प्रथमच बहुरंगी होणार आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर भाजप-शिवसेनाही रिंगणात उतरली आहे, तर स्थानिक रयत पॅनेलनेही शड्डू ठोकला आहे. परंतु गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये होणाऱ्या बंडखोरीच्या राजकीय भूकंपाने मात्र जि. प. इच्छुक उमेदवारांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही झोप उडाली आहे.मागील जि. प. निवडणुकीत आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील हे एकत्र होते. तडजोडीच्या अनेक फेऱ्यानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या विद्यमान अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्यावर टाकण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अर्ज भरण्यात आला. आबा-काका गट एकत्र असतानाही अवघ्या ३११७ मतांनी काँग्रेसविरोधात विजयी झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसतानाही येळावी, जुळेवाडीपुरत्या मर्यादित असणाऱ्या काँग्रेसने जबरदस्त झुंज दिली. तरीही राष्ट्रवादीने जि. प. बरोबर पंचायत समितीच्या तुरचीच्या हर्षदा पाटील व नागावचे शिवाजीराव पाटील या दोन्ही ठिकाणी बाजी मारली. सध्या या मतदार संघात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आबा, काका गट वेगवेगळे लढत असून, संजय पाटील भाजपमधून खासदार झाले आहेत. खासदारकीनंतरच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमय केले आहेत. तासगाव नगरपालिका व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे. मात्र त्यांना येळावी गणातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. येळावी गणात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. आरक्षणाअगोदर भाजपच्या येळावीतील अनेक शिलेदारांनी जि. प. साठी शड्डू ठोकला होता. त्यातच गावात आलेली अध्यक्षपदाची लाल दिव्याची गाडी सर्व गटाच्या नेत्यांना खुणावत होती.राष्ट्रवादीचा विचार करता या गणातून तुरचीचे संजय पाटील, संदीप पाटील, येळावीतून बापू माळी, शांताराम गावडे, वासुंबेतून बाळासाहेब एडके, गुंडूभाऊ एडके इच्छुक आहेत, तर भाजप व काँग्रेसमधील वातावरण पूर्णपणे शांत आहे. जि. प. गणाचा विचार करता, भाजपमधून येळावी गावचे विद्यमान सरपंच विश्वनाथ पांढरे, तुरचीचे आबास तांदळे, काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य सचिन गावडे इच्छुक आहेत, मात्र भाजप गटात तगडा उमेदवार नसल्याने विरोधी गटातील बंडखोर उमेदवारांवर भिस्त आहे. काँग्रेस कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीबरोबर किमान या मतदार संघापुरती आघाडी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. जि. प. मतदार संघाचा विचार करता, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे, परंतु आबांच्यानंतर आबा घराण्याबरोबर मोजक्याच कार्यकर्त्यांचे सूत जुळले आहे. याबरोबरच गावात जि. प. ची उमेदवारी न मिळाल्यास सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदवार देऊन मोठा भूकंप करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा प्रयोग याअगोदर येळावी ग्रामपंचायतीमध्ये रयत पॅनेलच्या रूपाने झाला होता. याचा मोठ्ठा तोटा प्रमुख गटांना होऊन भाजपचा फायदा झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीत जि. प. साठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार संजय पाटील यांनी टीका केल्याने जयंत पाटील यांनी तालुक्यात चांगलेच लक्ष घातले आहे. जि. प. अध्यक्षांनीही पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व विरोधकांना शह देण्यासाठी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा घेतला. दुसरीकडे भाजप व काँग्रेसमध्ये मात्र येळावी पं. स. गण वगळता, वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. भाजपची पूर्ण मदार आयात उमेदवारावर असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.