वारणावती : माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लवकरच लागू करणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे, अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू-पाटील यांनी दिले.
मुंबई येथील मंत्रालयात शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू-पाटील यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तत्काळ लागू करावा, कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती दिली जात नाही. त्याबाबत तसेच ज्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळालेली आहे त्यांना शालार्थी आयडी देण्याबाबत चर्चा झाली. शिवाय काही अधिकारी वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे शिक्षण राज्यमंत्र्यांनी पुढील काही दिवसांत विभागनिहाय कार्यालयात भेटी देऊन वस्तुस्थिती पाहून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतही या चर्चेत निर्णय झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, विजय जाधव, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विनोद गोरे आदी उपस्थित होते.
फोटो-११वारणावती१
फोटो- मुंबई येथे मंत्रालयात शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याशी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे शिवाजी खांडेकर यांनी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली.