फोटो : आष्टा जायंट्स रक्तदान शिबिर उद्घाटनावेळी वैभव शिंदे, रोहन झंवर, समीर गायकवाड, झुंजारराव पाटील, सूर्यकांत जुगदर, महेश कुलकर्णी, नितीन झंवर, स्नेहा माळी, विलास पाटील, बाबासाहेब सिद्ध, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क,
आष्टा : जायंट्स ग्रुप ऑफ आष्टाच्या सप्ताहानिमित्त उद्योगपती रामप्रताप झंवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात २१२ रक्तदात्यांनी उच्चांकी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, झंवर इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रोहन झंवर यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्षा स्नेहा माळी, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, डॉ. मनोहर कबाडे, यशोदीपचे महेश कुलकर्णी, सुभाष झंवर, नितीन झंवर, आर. आर. उंटवाल, डॉ. सतीश बापट, विराज शिंदे, राजेंद्र मळणगावकर, डॉ प्रवीण वंजाळे, चारुदत्त, वठारे उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, जायंट्स ग्रुपने कोरोना काळात केलेले काम अतुलनीय आहे. समाजाला आधार देण्याचे काम आष्टा शहरात होत आहे.
रोहन झंवर म्हणाले, उद्योगपती रामप्रताप झंवर यांचे आष्टा शहराच्या विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या स्मृती जपताना रक्तदान शिबिर आयोजित करीत स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे.
नितीन झंवर, अनुराधा झंवर, प्रा विलास पाटील ,सूर्यकांत जुगदर, बाबासाहेब सिद्ध ,राहुल मोरे ,दत्तात्रय सोकाशी, गौरव थोटे, आष्टा लाइनर्स, कस्तुरी फौंड्री ,यशोदिप अकॅडमी ,पोलीस ठाणे, नशाबंदी मंडळ, नेहरू युवा फेडरेशन यांचे सहकार्य लाभले.