वाळवा : वाळवा येथे अभिनव ग्रुपच्या नेतृत्वाखाली स्पंदन हाॅस्पिटल, आष्टा व श्री स्वामी समर्थ महिला पतसंस्था, वाळवा यांच्या वतीने आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचा शंभराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, डाॅ. सुमित कबाडे, डॉ. सुजय कबाडे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात, किसन गावडे, राजेंद्र औंधकर, अमर थोरात, धैर्यशील देशमुख, बजरंग गावडे, उपस्थित होते.
धनाजी शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बजरंग गावडे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले. अभिनव ग्रुपचे राजीव गावडे, मनोज खवरे, अक्षय फाटक, प्रमोद पांडे, किरण खवरे, महादेव शिंदे, प्रणाली पांडे यांनी नियोजन केले.