खानापूर : खानापूर येथे दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर, देसाई इन्फ्रा व ॲथाॅरिटी इंजिनिअर टी. पी. एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. वाहतुकीच्या नियमांबाबत वाहनचालकांना माहितीपत्रके वाटण्यात आली. तसेच गुलाबाची फुले देऊन वाहनचालकांचे स्वागत करण्यात आले. खानापूर शहरासह परिसरात रस्त्याकडेला वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले. यावेळी खानापूर पोलीस शाखेचे अधिकारी एस. एम. वाघमोडे, प्रदीप पाटील, एस. डी. घाडगे, एम. टी. कांबळे, एस. एस. पाटील, ॲथाॅरिटी इंजिनिअरचे अभियंता कमलाकर जावदे, नरेश अनंतकुमार, देसाई इन्फ्राचे गणेश पवार, संतोष कदम व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : १७ खानापूर १
ओळ : खानापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती पत्रकांचे वाटप एस. एम. वाघमोडे, प्रदीप पाटील, एस. डी. घाडगे, एम. टी. कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.