शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

‘वसंतदादा’च्या जमीन विक्रीला थंडाच प्रतिसाद

By admin | Published: December 05, 2014 10:43 PM

अधिकाऱ्यांचे मौन : निविदेचे गौडबंगाल काय?

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास तिसऱ्यावेळी मुदतवाढ दिल्यानंतर तिची मुदत शुक्रवारी संपली. यावेळी किती निविदा दाखल झाल्या, याची माहिती अधिकाऱ्यांनी गुप्त ठेवली आहे. यामुळे निविदा प्रकरणाचे गौडबंगाल काय?, असा प्रश्न कारखान्याच्या सभासदांतून उपस्थित होत आहे. कारखान्याच्या जागा विक्रीसाठी आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निविदा दाखल करण्याची मुदत संपली होती. जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी पुणे येथे असल्यामुळे शनिवारी माहिती देण्यात येईल, असे सांगितले.दरम्यान, जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीमधील काही अधिकाऱ्यांनी तिसऱ्यावेळीही एकही निविदा दाखल नसल्याचे सांगितले आहे. पुढे कोणता निर्णय घ्यावा, याबद्दल चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे निविदा प्रकरणाचे नक्की काय झाले आहे?, असा प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)