सांगली : सांगली अर्बन बँकेच्या इस्लामपूर शाखेमार्फत आयोजित लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बँकेचे संस्थापक म. ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या स्मरणार्थ रविवार, दि. १९ सप्टेंबर रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली अर्बन बँक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, विवकानंद वैद्यक प्रतिष्ठान (बामनोळी), बाळासाहेब देवरस प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथील विठ्ठल मंदिरात हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. जवळपास ३१३ नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
या लसीकरण मोहिमेवेळी शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर धैर्यशील पाटील, आयएमएच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र लादे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, संचालिका सई मंद्रुपकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक दिवेकर, शाखा सल्लागार बजरंग कदम आणि सुभाष शिंगण, एल. एन. शहा, संजय भागवत, पी. बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेबद्दल बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ व मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो : २२ इस्लामपूर १
ओळ : सांगली अर्बन बँकेतर्फे इस्लामपूर येथे आयाेजित लसीकरण शिबिरात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांचे सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, संचालिका सई मंद्रुपकर यांनी स्वागत केले.