शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सहकार विभागाचा निकाल गुलदस्त्यात

By admin | Published: December 27, 2015 11:51 PM

वसंतदादा बॅँक : युक्तिवाद अंतिम टप्प्यात आला तरी निर्णय नाही

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी युक्तिवादाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तरीही बॅँकेच्या दोन माजी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर सहकार विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. यातील सर्वांनी म्हणणे सादर केल्याने प्रत्यक्षात युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. युक्तिवादाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. माजी संचालक व कर्मचाऱ्यांपैकी १९ जणांचा युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यांना ३० डिसेंबर रोजी युक्तिवादासाठी संधी देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असतानाच, सहकार विभागाच्या निकालाअभावी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. घोटाळ्याप्रकरणी दोन तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार विभागाकडे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या निर्णयांविरोधात अपील केले होते. कागदपत्रांच्या प्रती विकत देण्याच्या मुद्द्यावर हे अपील होते. त्यामुळे सहकार विभागाने याप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांपुरती चौकशीला तात्पुरती स्थगिती देऊन नंतर त्यावर सुनावणी घेतली. सुनावणीला चौकशी अधिकाऱ्यांनीही म्हणणे सादर केले. त्यानंतर सहकार विभागाचा निकाल लगेच अपेक्षित होता. आता सुनावणी होऊनही महिना होत आला तरीही सहकार विभागाने याविषयीचा निर्णय अद्याप कळविलेला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या बॅँकेच्या चौकशीला अडथळा येऊ शकतो. (प्रतिनिधी) चौकशीच्या घडामोडीबँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक व ७३ कर्मचाऱ्यांना नोटिसासर्वांनी म्हणणे सादर केल्याने युक्तिवादाला सुरूवातयुक्तिवादाचे काम अंतिम टप्प्यातमाजी संचालक व कर्मचाऱ्यांपैकी १९ जणांचा युक्तिवाद अपूर्णदोन अधिकाऱ्यांच्या अपिलावर निर्णय नसल्याने संभ्रम