रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे शिवार फेरीवेळी उमेश पवार यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बी. डी. पवार, भगवानराव माने, अमोल कोळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी पदवीधर संघ इस्लामपूर, राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नालॉजी इस्लामपूर, बायर क्रॉप सायन्स, पशुपती विकास सोसायटी व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी इस्लामपूर येथे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचेहस्ते व कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शिवार फेरी व इतर पिकांतील हुमणी किड नियंत्रण या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले.
रेठरे हरणाक्ष फाट्यापासून डोंगर व रेल्वेलाईन परिसरात शिवार फेरी काढत प्रा. पांडुरंग मोहिते यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत हुमणी व इतर किडीविषयी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले शिवार फेरीमध्ये कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, पं. स. चे कृषी अधिकारी अमोल कोळी व बायर क्रॉफ सायन्सचे राहुल तकाटे यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.