रेठरे धरण येथे एप्रिल व मे महिन्यात कोरोना बधितांचा आकडा वाढलेला होता. दररोज सरासरी १० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. येथील आरोग्य केंद्र व जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका सूर्यवंशी, स्वाती सुतार यांच्यासह आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यावतीने घरोघरी आजारी लोकांची तपासणी करण्यात येत होती.
गावात राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांनीदेखील आपत्ती व्यवस्थापन कमिटीच्या बैठक घेऊन कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अमोल पाटील यांनी सुरू केलेल्या कोविड विलगीकरण कक्षाचा व ग्रामपंचायतमार्फत सरपंच लतिका पाटील यांनी सुरू केलेल्या कोविड विलगीकरण कक्षाचादेखील गावातील बाधित रुग्णांना फायदा झाला आहे.