सांगली : शहर पाेलिसांच्या हद्दीत घरफोडी करून चोरलेला माल चोरट्यांकडून हस्तगत करून तो मूळ मालकास परत देण्यात आला. शहर पोलिसांनी पावणेदोन लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत दिल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त केले.
शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीस गेल्या आठवड्यात जेरबंद केले होते. अतिरेकी ऊर्फ आकाश श्रीकांत खांडेकर, अक्षय धनंजय पोतदार, विजय संजय पोतदार, रोहित गणेश कोळी या चौघाही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या चौघांकडून दहा घरफोड्या उघडकीस आल्या होत्या.
वखारभागातील बंद फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. फिर्यादी भोज चेलूवय्या पुजारी यांना त्यांचा दीड लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला. शामरावनगरमधील बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. फिर्यादी राजगोंडा आदगोंडा एडवान यांनाही त्यांचा २३ हजारांचा ऐवज परत देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक फौजदार एम. एम. शेख, अमित परीट, आदी उपस्थित होते.