सांगली : शासकीय व निमशासकीय नोकरदार व आयकरदाते शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र असतांनाही जिल्ह्यात तब्बल २५५७६ जणांनी लाभ घेतलेला आहे. आता ही रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाद्वारा संबंधितांना नोटीस बजावणे सुरु केले आहे. घेतलेला लाभ परत न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.पीएम किसान सन्मान योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात प्रत्येकी सहा हजारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १४ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे. योजनेत अपात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने शासनस्तरावर पडताळणी करण्यात आली. यामध्ये २५५७६ शेतकरी शासकीय व निमशासकीय नोकरदार व आयकराचा भरणा करणारे आढळले. त्यामुळे या खातेदारांचा लाभ बंद करण्यात आला व त्यांनी लाभ घेतलेल्या सुमारे ३१ कोटींची वसुली आता करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधीत आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीसा दिल्या आहेत. पण, संबंधीतांकडून पैसेच वसूल होत नसल्यामुळे कठोर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
Sangli: आयकरदात्या २५ हजार ५७६ शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस
By अशोक डोंबाळे | Published: October 18, 2023 2:16 PM