सांगली : सांगली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पगारातील जमा रकमेतून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. ज्याच्याकडे रेशनकाडर् नाही, जे दारिद्रय रेषेच्याखली आहेत अशाना मदतीसाठी जिल्हाधिकारी ते सर्व महसूल अधिकारी यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपल्या पगारातून सुमारे एक लाख रूपयाचा निधी जमा केला व त्यातून जीवनावश्यक वस्तूचे 130 किट तयार केले. त्यातील मिरजेतील 55 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात किटचे केले वितरण करण्यात आले. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई, उपजिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आणि महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या पगारातील रकमेतून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. जवळपास एक लाख रुपयाचा निधी महसूल अधिकाऱ्यांच्या पगारातून जमा करण्यात आला आहे. मिरजेत 55 कुटुंबांना पहिल्य टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वितरण केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने गरीब गरजवंत अडचणीत होते. त्यांना मदत करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या पगारातील निधी जमा केला. त्यातून तयार करण्यात आलेल्या जीवनावश्यक किटचे वाटप मिरज कोल्हापूर रोडवर झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सोलापूर, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, बाराबनकी कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या गरजू कुटुंबाला करण्यात आले. उर्वरित किट वाटप करण्यात येणार आहे. गरजू कुटुंबांची माहिती घेऊन उपेक्षित राहिलेल्या कुटुंबांनात्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन महसूल अधिकारी कीटचे वितरण करीत आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.