शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वाळू माफियांपुढे महसूलचे अधिकारी हतबल

By admin | Published: December 05, 2015 12:38 AM

बेसुमार वाळू उपसा : पोलिसांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कारवाईचा होतोय फार्स

शरद जाधव --सांगली--जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी जात असताना महसूल प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. वाळू माफियांना रोखण्यासाठी मोहीम राबविताना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने, कोणत्याही संरक्षणाविना मोहीम राबवावी लागत आहे. ग्रामीण भागातील नद्या आणि ओढ्यांतून बेसुमार वाळू उपसा करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी स्वत: पुढाकार घेऊन मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. जतचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी, वाळू माफि यांविरोधात मोहीम राबवित असताना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. वाळू माफियांना रोखताना महसूल प्रशासनाला पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी पकडलेली वाहने ताब्यात घेण्यासही पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने, अगोदर अवैध वाळू उपशाविरोधात व त्यानंतर वाळू माफियांवर कारवाईसाठी काम करावे लागत आहे. महसूल प्रशासनाने वाळू माफियांविरोधात राबविलेल्या मोहिमेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रकार राज्यात अनेकदा घडले आहेत. याचे लोण जिल्ह्यातही आले असून, गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी वाळूची वाहने अंगावर घालणे, अधिकाऱ्यांच्या पथकाचा पाठलाग करणे, प्रसंगी पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रकारही घडल्याने, महसूल विभागाच्यावतीने वाळू तस्करीविरोधात मोहीम राबविताना सर्वप्रथम पोलीस संरक्षण मागविण्यात येते. अनेकदा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना धमक्या देण्याचेही प्रकार घडल्याने वाळू माफियांविरोधात मोहीम राबविताना महसूल विभागाने सतर्कता बाळगणे सुरु केले आहे. यात पोलिसांकडून संरक्षण व पथकात पोलीस कर्मचारी देण्यात येतो. मात्र, अनेकदा महसूल प्रशासनाकडून मागणी करुनही पोलीस संरक्षण मिळत नसल्याने वाळू माफिया शिरजोर झाल्याचेच चित्र दिसून येत आहे. मुख्यत्वेकरुन अवैध वाळू उपसा रात्रीच होत असल्याने महसूल विभागालाही रात्री मोहीम राबविताना अडचणी येत आहेत. या पथकात पोलिसांचा कर्मचारी असला, तर वाळू तस्करांवर जरब बसते. पण पोलिसांनी मात्र मोहिमेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शविल्याने वाळू माफियांचे फावले आहे. अवैध वाळू उपशाविरोधात मोहीम राबविणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्यांना सर्वात महत्त्वाचे संरक्षण मिळत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून वाळू माफियांविरोधात मोहीम उघडणाऱ्या अधिकाऱ्यांना बळ देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.अवैध वाळू उपसा : रस्त्यांची झाली ‘चाळण’ नदीपात्रातून आणि ओढ्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाने परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी याविरोधात स्वत: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी पोलीस संरक्षण देत मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. वाळू तस्कर रस्त्यांबरोबरच नदीपात्र व ओढे खरवडून काढत असल्याने, पाणी साठवण क्षमतेवरही त्याचा परिणाम झाल्याने अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनीही आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. वाळू माफियांना लगाम शक्यतालुका पातळीवर तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू उपशाविरोधात मोहीम तीव्र होत असताना, त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी स्वत: यात लक्ष घालून समन्वय साधल्यास, प्रशासनाला शिरजोर ठरू पाहत असलेल्या वाळू माफियांना लगाम घालणे शक्य आहे. प्रतिक्रियेस नकारवाळू तस्करांविरोधात मोहीम राबविताना महसूल आणि पोलीस प्रशासनातील समन्वयाबाबत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी रजेवर असल्याचे सांगत, प्रतिक्रिया दिली नाही.