ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, देवराज पाटील यांनी आढावा बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालय व कोरोना केअर सेंटरला भेट दिली.
आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या उपाययोजनांची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, तलाठी पंडित चव्हाण यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवा, चाचण्या वाढवा, बाधीत रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्या व नियम पाळा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी केल्या केल्या. सरपंच छाया रोकडे यांनी स्वागत केले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच सर्जेराव पाटील, सुभाष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील, जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील, जयसिंग पाटील, अनिल साळुंखे, बाळासाहेब रोकडे, सर्व सदस्य, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.