सांगली : जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याबराेबरच इतर प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाने नियोजन करावे, अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिल्या.
महानिरीक्षकांनी बुधवारी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर परिक्षेत्राचा कार्यभार घेतल्यानंतर दुसर्यांदा ते जिल्हा दौर्यावर आले होते. बुधवारी दुपारी पोलीस मुख्यालयात त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यांच्याकडून आढावा घेत तपासाबाबत सूचना दिल्या. प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्याबराेबरच इतर गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी अधीक्षक गेडाम यांच्यासह अतिरिक्त अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.