शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

कराची शंभर टक्के वसुलीच्या गावांना बक्षीस

By admin | Published: July 14, 2017 11:08 PM

कराची शंभर टक्के वसुलीच्या गावांना बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करणाऱ्या गावांना बक्षीस देण्यात येईल. तसेच प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के पाण्याचे नळ कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी गटविकास अधिकारी आणि खातेप्रमुखांना दिल्या. तसेच जिल्हा परिषदेने यावर्षी यशवंत पंचायत राज अभियानात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि. १७ रोजी होत आहे. याच्या तयारीसाठी दहा पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह खातेप्रमुखांची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेत झाली. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, समाजकल्याण समितीचे सभापती ब्रह्मदेव पडळकर, बांधकाम व अर्थ समिती सभापती अरुण राजमाने, शिक्षण व आरोग्य समिती सभापती तमण्णगौडा रवी-पाटील आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीचे उत्पन्न वाढीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विभागाची वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळी योजना पाहिजे. पाणीपट्टी, घरपट्टीची शंभर टक्के वसुली करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत. कराची शंभर टक्के वसुली करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के पाणी कनेक्शन दिली पाहिजेत. यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असून, पाणी योजना चांगल्या पध्दतीने चालण्यास मदत होणार आहे. या प्रश्नावर सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, जिल्हा परिषद पदाधिकारी तुम्हाला शंभर टक्के मदत करतील, असा विश्वासही देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिला.यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जिल्हा परिषदेने भाग घेतला पाहिजे. यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगली प्रतिमा निर्माण होईल. विकासकामांना गती मिळणार, असेही देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार यशवंत पंचायत राज अभियानात जिल्हा परिषदेने भाग घेण्यास अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनीही सहमती दिली. संग्रामसिंह देशमुख पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी जुन्या कागदावरून अहवाल सादर करण्याची पध्दत बदलली पाहिजे. जनतेसमोर त्यांच्या हिताच्या नवीन योजना मांडल्या पाहिजेत. पाण्याचे स्रोत निश्चित : करूनच योजनांना मंजुरीज्या गावामध्ये पाण्याचा स्रोत चांगला नाही, अशा ठिकाणी यापुढे पाणी योजनांना मंजुरी देण्यात येणार नाही. याबाबत अधिकाऱ्यांनीही कठोर भूमिका घ्यावी. कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करूनही पाण्याचा स्रोत बंद असल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी अडकून पडला आहे. हे प्रकार थांबविण्यासाठीच पाण्याचा स्रोत निश्चित आणि चांगला असेल, याची खात्री केल्याशिवाय पाणी योजनांना मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात येणार आहे, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.